रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १८५ रुग्ण, १४१ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २८ जानेवारी) करोनाचे नवे १८५ रुग्ण आढळले, तर १४१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार ६०१ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७९ हजार ९१४ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.५९ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७९० पैकी ७११ निगेटिव्ह, तर ७९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १,०६३ पैकी ९५७ नमुने निगेटिव्ह, तर १०६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ९८ हजार ६६६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,१३१ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८४९, तर लक्षणे असलेले २८२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७८२ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३४९ जण आहेत. एकूण ४५ रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १४०, तर डीसीएचमध्ये १४२ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ६७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात २ रुग्ण दाखल आहेत.

आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५११ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ०.५८ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२७ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७७, चिपळूण ४८६, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३४, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५११).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात २७ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ६२ सत्रे पार पडली. त्यात २९९ जणांनी लशीचा पहिला, तर १,८४६ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,१४५ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ८०, तर ४०९ जणांनी बूस्टर डोस घेतले. २७ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४६ हजार ८६५ जणांचा पहिला, तर ८ लाख १५ हजार १८३ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply