रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १२ फेब्रुवारी) ४१ नवे रुग्ण आढळले, तर ७४ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४०२ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले २०१, तर लक्षणे असलेले तेवढेच म्हणजे २०१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरण आणि संस्थात्मक विलगीकरणातही तेवढेच म्हणजे प्रत्येकी २०१ जण आहेत.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार २९१ रुग्ण आढळले असून त्यापैकी ८१ हजार ३०६ म्हणजे ९६.४६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १,४५७ पैकी १,४२७ निगेटिव्ह, तर ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ५५६ पैकी ५४५ नमुने निगेटिव्ह, तर ११ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १५ हजार ५३७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
एकूण ५७ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८०, तर डीसीएचमध्ये १२१ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ८ रुग्ण दाखल आहेत.
मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२६ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.२३ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १८०, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३९, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २,५२६).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात ११ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ८४ सत्रे पार पडली. त्यात २०८ जणांनी लशीचा पहिला, तर २,२७१ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,३७९ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील २,२४३ जणांनी पहिला, तर ४२९ जणांनी बूस्टर डोस घेतला. ११ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५० हजार ३०८ जणांचा पहिला, तर ८ लाख ३९ हजार ५८१ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ८९ हजार ८८९ जणांचे लसीकरण झाले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media