woman in white dress shirt using white microscope

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या स्थितीत चांगलीच सुधारणा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ फेब्रुवारी) नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या चौपट आणि एकाही रुग्णाच्या मृत्यूचीन नोंद आज झाली नाही. त्यामुळे करोनाच्या स्थितीत चांगलीच सुधारणा दिसून आली.

आज नवे १२ रुग्ण आढळले, तर ४९ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ३१५ रुग्ण आढळले असून त्यापैकी ८१ हजार ४३६ म्हणजे ९६.५९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २११ पैकी २०१ निगेटिव्ह, तर १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १३१ पैकी १२९ नमुने निगेटिव्ह, तर २ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १६ हजार ७११ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३२० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १२०, तर लक्षणे असलेले म्हणजे २०० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात १२०, तर संस्थात्मक विलगीकरणात २०० रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण ३३ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८०, तर डीसीएचमध्ये १२० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ८ रुग्ण दाखल आहेत.

मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२६ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.७१ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १८०, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३९, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २,५२६).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाचे एक सत्र पार पडले. त्यात एकाने लशीचा पहिला, तर दोन जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण तीन जणांचे लसीकरण १३ फेब्रुवारीला झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील एकानेही काल लस घेतली नाही, तर सात जणांनी बूस्टर डोस घेतला. १३ फेब्रुवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५० हजार ४२० जणांचा पहिला, तर ८ लाख ४० हजार ६५८ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ९१ हजार ७८ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply