चित्रकार बाळ ठाकूर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेतर्फे येत्या १८ ते २० फेब्रुवारी याकाळात होणाऱ्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणार असलेल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भांबेड येथील जगप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. ठाकूर यांचे गेल्या ८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे.

प्रभानवल्ली-खोरनिनको (ता. लांजा) येथील आदर्श विद्यामंदिरात ज्येष्ठ समीक्षक वि. शं.चौगुले साहित्यनगरीत हे साहित्य संमेलन होणार आहे.

राजापूर आणि लांजा या दक्षिण रत्नागिरीतील दोन तालुक्यांच्या विकासासाठी स्वातंत्रोत्तर कालखंडात सुरू झालेल्या आणि गेली सहा वर्षे वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करुन नावारूपाला आलेल्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेतर्फे विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षीही ज्येष्ठ साहित्यकार गंगाराम गवाणकर, अशोक लोटणकर, प्रमोद जोशी, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य दत्ता पवार, इतिहास अभ्यासक भगवान चिले, सुनील कदम, काष्ठशिल्पकार विजय पालकर, रितिका पालकर यांच्या उपस्थितीत संमेलन होणार आहे. त्यानिमित्ताने लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यांमधील साहित्य, कला, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, ग्रामीण, महिला विकास या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विविध कर्तृत्ववान व्यक्तींना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.
संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी या पुरस्कारांची माहिती दिली.

विविध पुरस्कारांचे मानकरी असे – १. साने गुरुजी पुरस्कार (प्राथमिक शिक्षकांकरिता) – श्रीमती प्रिया मांडवकर (जि. प. शाळा क्र. १, प्रभानवल्ली, लांजा), रामदास पांचाळ
(जि. प. प्राथमिक शाळा, खरवते, राजापूर),

२. प्रा. मधु दंडवते पुरस्कार (माध्यमिक शिक्षकांकरिता) – जयसिंग पाटील
(मुख्याध्यापक, बॅ. नाथ पै विद्यालय व ज्युनि.कॉलेज,हर्चे), महादेव पाटील (मुख्याध्यापक,
नूतन विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज, ओणी, ता. राजापूर).

३. बॅ. नाथ पै पुरस्कार (सामाजिक कार्यकर्ते) – गुरुप्रसाद देसाई (लांजा), संजय सुतार (मूर, ता. राजापूर).

४. बळीराजा पुरस्कार (शेतकरी) – मारुती मुगुटराव (प्रभानवल्ली, लांजा), सुहास शंकर तावडे (विलये, राजापूर).

५. नारायण तावडे जनमित्र पुरस्कार (सरकारी -निमसरकारी कर्मचारी) – श्रीमती प्रणाली रेडीज (ग्रामसेवक, लांजा), अभिजित दा. कोरे (ग्रामविकास अधिकारी, मूर, राजापूर).

६. नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्कार (कलाक्षेत्राकरिता) – मंगेश हांदे (रिंगणे, लांजा), लीलाधर सुतार (नेरकेवाडी, राजापूर).

अक्षरमित्र पुरस्कार (साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्राकरिता) – विजयालदक्ष्मी देवगोजी (लांजा), नरेंद्र मोहिते (नेरकेवाडी, राजापूर).

८. माऊली पुरस्कार (वारकरी क्षेत्राकरिता) हभप संतोष कुर्णेकर (भांबेड, लांजा), हभप विद्याधर करंबेळकर (उन्हाळे, राजापूर).

९. आदर्श गृहिणी पुरस्कार (संघर्षातूनही संसार करणार्‍या स्त्रिया) – अरुणा हटकर (लांजा), श्रीमती निकिता जाधव (तळवडे, राजापूर).

१०. सावित्रीबाई फुले सामाजिक कार्यकर्ता महिला पुरस्कार – श्रीमती स्वप्ना सावंत (लांजा), श्रीमती अपेक्षा मासये (पाचल, राजापूर).

११. उद्यमश्री पुरस्कार (उद्योग क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती) – अशोक पालांडे (प्रभानवल्ली, लांजा), रघुनाथ धोंडू पवार (खोरनिनको, लांजा).

१२. संस्था कार्यकर्ता पुरस्कार (संस्थेत प्रामाणिकपणे योगदान करणारे सदस्य) – चंद्रकांत खामकर (आरगाव, लांजा).

१३. जीवनगौरव पुरस्कार (जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवनगौरव पुरस्कार) – ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर (भांबेड, लांजा) (मरणोत्तर). श्रीमती रजनी गोपाळ पांचाळ जीवनगौरव पुरस्कार –
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडू खांडेकर (कोचरी, लांजा).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply