रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे करोनाबाधित; २८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ फेब्रुवारी) करोनाचे १० नवे रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४२२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ८१७ म्हणजे ९६.९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १८७ पैकी १८१ अहवाल निगेटिव्ह, तर ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३८६ पैकी ३८२ नमुने निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २३ हजार ३७१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ६७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ३२, तर लक्षणे असलेले ३५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ३१, तर संस्थात्मक विलगीकरणात ३६ जण आहेत. एकूण ४ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे..

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये २१, तर डीसीएचमध्ये १४ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एक रुग्ण उपचार घेत आहे. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तर अतिदक्षता विभागात एक रुग्ण आहे.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २५३४ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ६.४५ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात २३ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची २७ सत्रे पार पडली. त्यात ९८ जणांनी लशीचा पहिला, तर ९१२ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १०१० जणांचे लसीकरण २३ फेब्रुवारीला झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील १६४३ जणांनी २३ फेब्रुवारीला लस घेतली, तर १५१ जणांनी बूस्टर डोस घेतला. २३ फेब्रुवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५१ हजार ७०९ जणांचा पहिला, तर ८ लाख ५२ हजार ९४५ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १९ लाख ४ हजार ६५४ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply