हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेत `बाकी शून्य`ची बाजी

मुंबई : हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील साईकला कला क्रीडा मंचाच्या बाकी शून्य नाटकाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. रत्नागिरीतील समर्थ रंगभूमीने सादर केलेल्या लिअरने जगावं की मरावं? या नाटकाला दुसरा क्रमांक जाहीर झाला आहे. या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर या संस्थेच्या गांधी विरुद्ध सावरकर या नाटकाला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत २२ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२२ या कालावधीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात एकूण १५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. त्यात रत्नागिरीतील ६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ नाटकांचा समावेश होता.

स्पर्धेतील अन्य निकाल असा :
दिग्दर्शन : प्रथम – ओंकार पाटील (नाटक- लिअरने जगावं की मरावं?), द्वितीय – केदार देसाई (नाटक-बाकी शून्य), प्रकाशयोजना : प्रथम – राजेंद्र शिंदे (नाटक – लिअरने जगावं की मरावं ?), द्वितीय – शाम चव्हाण (नाटक -प्रतिमा-एक गाणे), नेपथ्य : प्रथम – प्रवीण धुमक (नाटक- लिअरने जगावं की मरावं?), द्वितीय – प्रदीप मेस्त्री (नाटक- बोगनवेल), रंगभूषा : प्रथम – गोपाळ चेंदवणकर (नाटक- लोककथा-७८), द्वितीय – संजय जोशी (नाटक-तुका अभंग अभंग), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक तृप्ती राऊळ, केदार देसाई (नाटक- बाकी शून्य), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – साक्षी हळदणकर (नाटक- लोककथा-७८), आसावरी आखाडे (नाटक-प्रतिमा-एक गाणे), ऋचा मुकादम (नाटक- लिअरने जगावं की मरावं?), वैशाली जाधव (नाटक- मु. पो. किन्नोर), सुविधा कदम (नाटक-कायापालट),
डॉ. गुरुराज कुलकर्णी (नाटक-गांधी विरुद्ध सावरकर), ओंकार आंबेरकर (नाटक- तुका म्हणे), मंदार कुंटे (नाटक-बाकी शून्य), कुणाल गमरे (नाटक-थैमान), रोहिदास चव्हाण (नाटक-चांडाळ चौकडी).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीपाद जोशी, नंदकुमार सावंत आणि श्रीमती प्राची गोडबोले यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply