गंधर्वगाथा – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२६ मार्च २०२२, सकाळी १०.३० वाजता) – गंधर्वगाथा

सादर करणारी संस्था – प्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोजचे नाट्यप्रयोग होतील. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज २६ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता गंधर्वगाथा हे नाटक प्रमुख कामगार अधिकारी (बृहन्मुंबई महानगरपालिका) यांच्यातर्फे सादर करण्यात आला.

गेली पंचेचाळीस वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिका राज्य नाट्य स्पर्धेत हौशी राज्य नाट्य, हिंदी राज्य नाट्य आणि संगीत राज्य नाट्य या स्पर्धांमध्ये सहभाग घेत आली आहे. विविध पारितोषिके मिळवून स्वतः चा ठसाही महापालिकेच्या कामगार विभागाने उमटवला आहे.

यावर्षी सादर होणाऱ्या संगीत गंधर्वगाथा या नाटकाचे लेखक आहेत प्रदीप ओक. दिग्दर्शन सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते संदेश जाधव यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शक डॉ. राम पंडित यांनी अप्रतिम चाली बांधल्या आहेत.

गंधर्वगाथा हे संगीत नाटक एका गायकाच्या जीवनावर आधारित आहे. ज्याचा एका अपघातात मृत्यू होतो आणि वैकुंठाच्या वाटेवर तो गायक साक्षात विठ्ठलासोबत आपल्या आयुष्याचे अवलोकन करतो. त्यातून नाटक उलगडत जाते. फ्लॅशबॅकच्या माध्यमातून त्याच्या जीवनातील संघर्ष, चढउतार,त्याच्या हातून घडलेल्या चुकांचा परामर्श तो घेतो. आपल्या हातून आपल्या पहिल्या पत्नीवर झालेल्या अन्यायाचे त्याला वैषम्य वाटत राहते. त्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी साक्षात विठ्ठल काय मार्ग दाखवतात, हाच या नाटकाचा विषय आहे.

श्रेयनामावली :

लेखन : प्रदीप ओक
दिग्दर्शन : संदेश जाधव
संगीत दिग्दर्शक : डॉ. राम पंडित
तालवाद्य : मिलिंद वाणी
पार्श्वसंगीत : अक्षय जाधव
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
नेपथ्य : सुनील जाधव
रंगभूषा : उदयराज तांगडी
वेशभूषा : मंगेश कांबळे

भूमिका आणि कलावंत :
पंडितजी : संजीव बर्वे
विठ्ठल : प्रीतेश मांजलकर
मंदा : मृदुला अय्यर
चंद्रिका : नम्रता काळसेकर
सारंग : अनुप येरूणकर
अमर : ऋषिकेश जाधव
रिपोर्टर : विनीत लाड
हरिभाऊ : सुशील कांबळे
वामन : सुमित कदम
आयोजक : मिलिंद कांबळे
इतर : उत्तम खजुरे, सचिन जाधव, मंगेश कांबळे, कृष्णा जाधव, अक्षय मुटाटकर, भरत कांबळे, शमिका डोंगरे, कोमल आंगणे

स्पर्धेचे वेळापत्रक

२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply