आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे निकाल जाहीर

देवरूख : जागतिक महिला दिन (८ मार्च) म्हणजे सर्वच क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस. या दिवसाच्या निमित्ताने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, प्रशिक्षण, कार्यशाळा, योगासनांची प्रात्यक्षिके, चित्रप्रदर्शन, तसेच ऑनलाइन व ऑफलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. महिला सुरक्षा व महिला सबलीकरण सप्ताहानिमित्ताने कोकण विभागीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे परीक्षण ईरा जोशी, डॉ. सोनल अनावकर व डॉ. वर्षा फाटक यांनी केले.

उत्तम प्रतिसाद लाभलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा निकाल असा –
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम – चैतन्या तेंडोलकर (ए. एस. पी., देवरूख),
द्वितीय – समीक्षा गरुड (रुईया, मुंबई),
तृतीय – सुजल पालकर (सी. एच. एम., उल्हासनगर),
उत्तेजनार्थ – मनाली जंगम (ए. एस. पी., देवरूख).

निबंध स्पर्धा – प्रथम – श्रद्धा हळदणकर (गोगटे-जोगळेकर, रत्नागिरी),
द्वितीय – चैतन्या तेंडोलकर (ए. एस. पी., देवरूख),
तृतीय – धनश्री साळवी (डी. जी. के., रत्नागिरी),
उत्तेजनार्थ – यश सावंत (कला – वाणिज्य, सावर्डे).

घोषवाक्य स्पर्धा – प्रथम – सिद्धी साळवी (गोगटे-जोगळेकर, रत्नागिरी),
द्वितीय – सुनिधी मराठे (गोगटे, शिरोडा),
तृतीय – गौतमी सरदेसाई
उत्तेजनार्थ – चैतन्या तेंडोलकर (दोन्ही ए. एस. पी., देवरूख)

वरील तीनही स्पर्धांची तांत्रिक बाजू ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे आणि प्रा. अजित जाधव यांनी उत्तम प्रकारे सांभाळली.

जागतिक महिला दिनी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी महाविद्यालयातील कार्यरत महिला कर्मचारी व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत महिलांना सन्मानित केले. सृष्टीज्ञान संस्था, मुंबई व महाविद्यालयाच्या वतीने ‘गौरव वसुंधरेच्या लेकींचा’ या उपक्रमाअंतर्गत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान केलेल्या महिलांना गौरविण्यात आले. पंत वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

महाविद्यालयाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसाठी खालील ऑनलाइन व्याख्याने आयोजित करण्यात आली.
१. राष्ट्रीय छात्र सेनेतील स्त्रियांचे योगदान – वैनायकी कुलकर्णी.
२. महिलांचे आरोग्य व आहार – डॉ. अस्मिता केळकर.
३. उद्योजकता विकासातील महिलांचे योगदान – डॉ. सुप्रिया हॅम.
४. आरोग्य आणि जीवनशैली व्यवस्थापन – डॉ. सुमन पांडे.
५. महिलांसाठीचे विशेष कायदे – अ‍ॅड. पूनम चव्हाण.

‘भारतीय महिलांचा सामाजिक दर्जा’ या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या चित्रप्रदर्शनात पोस्टर, कार्टून व कोलाज या चित्रकृतींचा प्रामुख्याने समावेश होता. (‘भारतीय महिलांचा सामाजिक दर्जा’ या विषयावर आधारित चित्रप्रदर्शनातील काही लक्षवेधी चित्रांचा कोलाज या बातमीसोबत दिला आहे.)

या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. या सर्व कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, अ‍ॅड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक एम. आर. लुंगसे यांनी कौतुक केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply