तळेरे येथील विशाल कडणे दुसऱ्यांदा `भांडुप भूषण`

तळेरे (ता. कणकवली) : समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो. मूळच्या तळेरे (ता. कणकवली) येथील विशाल कडणे या उच्चविद्याविभूषित तरुणाने दुसऱ्यांदा भांडुप भूषणपुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे.

विशाल कडणे यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून फक्त मुंबईलाच नाही तर अखंड महाराष्ट्राला भुरळ घातली. मुंबईचा ओक्सिमन अशी ओळख त्यांनी मिळविली. त्यांचा मुंबईत भांडुप येथे कोकण विकास आघाडीच्या कार्यक्रमात भांडुप भूषण गौरवाने सन्मान करण्यात आला.

करोनाच्या काळात स्वखर्चाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवण्याचे काम विशाल कडणे यांनी केले होते. मोफत मास्क, औषधे, धान्य इत्यादी यथाशक्ती त्यांनी मोफत वाटले होते. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन लंडन बुक ऑफ रेकॉर्डसने त्यांचा विशेष सन्मान केला होता. लंडनच्या महापौरांनी विशाल कडणे यांचे स्वतः फोन करून कौतुक केले होते. याच कार्याची दखल घेत भांडुपमधील कोकणवासीय चाकरमान्यांनी एका भव्य कार्यक्रमात भांडुप भूषण सन्मानाचे आयोजन केले होते.  पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विशाल कडणे यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे आमदार श्याम सावंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला.

विशाल कडणे यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या पालकांना आणि हेल्थकेअर फ्रंट वर्कर्सना दिले. विशाल कडणे यांना भांडुप भूषण पुरस्कार २०१४ सालीदेखील मिळाला होता. दोनदा भांडुप भुषण पुरस्कार मिळवणारे ते पहिले भांडुपकर ठरले आहेत.
त्यांना पुरस्कार देताना स्थानिक खासदार मनोज कोटक, आमदार आशीष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 
(निकेत पावसकर)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply