चव आहे खास म्हणून ग्राहकांचा हर्षलाच्या चवीवर विश्वास

हर्षलाज होम मेड व्हरायटीज या नावाने वेगवेगळ्या प्रकारची पिठे बनवण्याचा व्यवसाय रत्नागिरीत करते. गेल्या सात वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत आहे.

माझ्या घरात व्यावसायिक वातावरण पहिल्यापासूनच होते. परंतु मला मात्र पिढीजात व्यवसाय करायचा नव्हता. वेगळी वाट चोखाळायची असल्याने मी या व्यवसायात येण्याचे ठरवले. माझी आई आणि आजीला पारंपरिक तसेच इतर प्रांतीय पदार्थ करून बघायची खूप आवड. त्यामुळे तेच बाळकडू लहानपणापासून मला मिळाले. त्यातूनच माझी या विषयातील गोडी वाढली. जेव्हा व्यवसायात येऊन स्वतःची ओळख निर्माण करायचे ठरवले, तेव्हा माझ्या आवडीलाच व्यवसाय बनवले. त्यातून हर्षला होम मेड व्हरायटीजचा जन्म झाला.

सुरवातीला बनवलेले पीठ कसे आहे, हे तपासून पाहण्यासाठी ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना सॅम्पल म्हणून पिठे दिली. तसेच पिठापासून बनणारे अनेक पदार्थ लोकांना बनवून खाऊ घातले. लोकांचा वाढता प्रतिसाद बघून व्यवसायवाढीसाठी वेगवेगळ्या शहरातील ओळखीच्यांना पीठ पाठवायला सुरवात केली. यावेळी जसे चांगले अनुभव आले, तसेच वाईट अनुभवही आले. काहींनी पीठ कसे बनवले आहे, हे विचारून स्वतःही ते बनवण्याचा प्रयत्न करून झाला. पण तो असफल झाला. कारण हाताची चव!

ग्राहकांना दर वेळी काहीतरी नवीन चव द्यायची, म्हणून भगरा हे नवीन पीठ बाजारात आणले. बेसनाला उत्तम पर्याय म्हणून याचा वापर होऊ शकतो. सुरवातीला ज्यांनी ज्यांनी पीठ वापरून बघितले, त्यावेळी त्यांना जो अनुभव आला, त्या वेळचा अनुभव आजही तसाच आहे. याचे कारण म्हणजे पिठाचा रंग आणि चव. बाजारपेठेत कच्च्या मालाची किंमत वाढली तरी आम्ही गुणवत्तेत कधीही तडजोड केली नाही, प्रसंगी स्वतःच्या फक्त फायद्याचा विचार केला नाही. म्हणूनच मी अभिमानाने म्हणते की, चव आहे खास म्हणून ग्राहकांचा आहे हर्षलाच्या चवीवर विश्वास.

एवढ्या वर्षांनंतर व्यवसायवाढीच्या दृष्टिकोनातून फक्त पिठे न बनवता वेगवेगळ्या प्रकारची लोणची, चटण्या तसेच सीझनल कोकणी पदार्थही छोट्या प्रमाणात बनवायला सुरवात केली. बहुसंख्य महिला कामाच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर असतात. घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. त्यांचा हा भार थोडासा कमी करण्यासाठी आम्ही बनवत असलेल्या नेहमीच्या पिठाबरोबर काही इन्स्टंट पीठ आम्ही आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. सध्याचा जमाना ऑनलाइनचा आहे. लोकांना सगळे पटकन हवे असते. त्यामुळे येत्या काळात रेडी टू इट पदार्थही बाजारात आणणार आहोत.

  • स्नेहा रमेश जोशी
    हर्षला होम मेड व्हरायटीज,
    कुवारबाव, रत्नागिरी
    (संपर्क : 7066326058, 7020543970)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply