अण्णा शिरगावकर स्मृती लेख, फोटोग्राफी आणि व्हिडीओ स्पर्धा

रत्नागिरी : ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेने इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लेख, फोटोग्राफी आणि व्हिडीओ स्पर्धा आयोजित केली आहे.

दाभोळ (ता. दापोली) येथील मूळचे रहिवासी आणि अखेरच्या काळात चिपळूण तालुक्यात शिरगाव येथे वास्तव्याला असलले इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी कोकणाच्या इतिहासासाठी केलेले कार्य अजोड होते. त्यांच्या या कार्याला उजाळा मिळावा, यासाठी लेख, व्हिडीओ आणि फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेसाठी विषय माझे गाव (गावगाथा) असणार आहे. त्यात दापोली तालुक्यातील कोणतेही गाव, गावातील वैशिष्ट्यपूर्ण असे देवस्थान – उत्सव – प्रथा-परंपरा – यात्रा-जत्रा – गावातील कर्तबगार व्यक्ती – घराणी वा उपक्रमशील संस्था अशा कोणत्याही विषयावर जास्तीत जास्त १५०० शब्दांत लेख लिहून पाठवणे अपेक्षित आहे. स्पर्धेत पहिल्या लेखास २ हजार, दुसऱ्या लेखास एक हजार ५०० आणि तिसऱ्या क्रमांकाच्या लेखाला एक हजार बक्षीस दिले जाईल. उत्तेजनार्थ प्रत्येकी पाचशे रुपयांची पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत.

व्हिडीओ स्पर्धेसाठी दापोली तालुक्यातील गावांची माहिती, कर्तबगार व्यक्ती वा उपक्रमशील संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, देवस्थान, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक जीवन, निसर्गवैभव अशा कोणत्याही विषयावर तीन ते चार मिनिटे कालावधीचा व्हिडीओ तयार करावा. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि एक हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येका विशेष पारितोषिक दिले जाईल. आयोजकांनी सुचवलेल्या सुधारणा आणि वाढीव तपशील यांसह लेख वा व्हिडीओ पाठवल्यास संपादकांच्या सूचनेनुसार तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर स्पर्धकाचे छायाचित्र, -अल्पपरिचयासह प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी मानधन मिळेल.

फोटोग्राफी स्पर्धेसाठी दापोली तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिपणारे फोटो आणि त्याबाबतची थोडक्यात माहिती हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेत विजेत्या पहिल्या तीन छायाचित्रकांना अनुक्रमे २ हजार, एक हजार ५०० आणि एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. स्पर्धकांनी त्यांचे साहित्य १० डिसेंबरपर्यंत info@thinkmaharashtra.com या ईमेलवर पाठवावे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या तालुकावार माहिती संकलन मोहिमेस परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अश्विनी भोईर (8830864547) किंवा नीतेश शिंदे (9892611767) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अण्णा आणि कै. सौ. नंदिनी शिरगावकर यांचे १९६२ सालचे छायाचित्र.
अण्णा आणि कै. सौ. नंदिनी शिरगावकर यांचे अण्णांच्या ८० व्या वाढदिनी घेतलेले छायाचित्र.
ताम्रपट पाहताना अण्णा शिरगावकर
कोरोना पूर्व काळातील क्षण. (३१ डिसेंबर २०१९) याही वयात प्रवास करून इतिहास जाणून घेण्याची अण्णांची उमेद कायम होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply