रत्नागिरी : राज्य शासनाची एकसष्टावी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. स्पर्धेचे रत्नागिरी केंद्रावरील वेळापत्रक जाहीर झाले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. रत्नागिरी केंद्रांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटके मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सुरू आहेत., तर ३० नोव्हेंबरपासून रत्नागिरीत स्पर्धा सुरू होणार आहे.
स्पर्धेच्या या प्राथमिक फेरीतील नाटके ४ डिसेंबर आणि ११ डिसेंबर हे दोन्ही रविवार वगळता दररोज सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर होणार आहेत. रत्नागिरी केंद्रावर ११ नाटके सादर होणार असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यूथ फोरम (देवगड) या संस्थेच्या निर्वासित या नाटकाने रत्नागिरीतील स्पर्धा सुरू होईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

