रत्नागिरीत दोन दिवसांची ओंकाराधिष्ठित आवाज साधना कार्यशाळा

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेने गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृति ॐकार आरोग्य ही ॐकाराधिष्ठित भारतीय आवाज साधना कार्यशाळा आयोजित केली आहे. येत्या रविवार आणि सोमवारी (दि. २७, २८ नोव्हेंबर) होणाऱ्या या मुंबईतील श्रीकांत रानडे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेत आरोग्यासाठी ॐकार साधना कशी उपयुक्‍त ठरते, त्याचे वैज्ञानिक विश्‍लेषण आणि प्रात्यक्षिक दाखविले जाईल. भारतीयांच्या जीवनशैलीमध्ये आहार, विहार, विचार, आवाज शास्त्र (व्हॉइस कल्चर) या नियमांचे पालन कसे होत असते, यावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले जाणार आहे. आवाज निर्मिती, सुयोग्य श्वसन, श्वासोच्छ्वासावार ताबा मिळवणे, सप्तकानुसार आवाजाचे पोत बदलणे, ॐकार, प्राणायाम, वर्णोच्चार, शब्दोच्चार, व्याकरण याविषयीचा अभ्यास करून घेतला जाईल. आवाज बसणे, घसा दुखणे, आवाज न चढणे वगैरे आवाजाच्या तक्रारी असणाऱ्यांना त्यांची कारणे आणि उपाय याविषयी अवगत केले जाईल. तसेच साधनेसाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. आवाज निर्मिती करताना ताण कशाने येतात आणि त्याचे निवारण करण्यासाठी कोणती साधना करावी, याविषयीही माहिती दिली जाणार आहे.

गायक, निवेदक, शिक्षक, समुपदेशक, मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्‍ती, आवाजाच्या तक्रारी असणारे, आपले गायन अधिक प्रभावी करू इच्छिणारे अशा सर्वांसाठी उपयुक्‍त अशी ही कार्यशाळा आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दी प्रायोजित केली आहे.

दोन दिवसांच्या या कार्यशाळेचे वेळापत्रक असे – रविवार, २७ नोव्हेंबर २०२२ सकाळी ९ ते दुपारी १, दुपारी २ ते सायंकाळी ६. सोमवार, २८ नोव्हेंबर २०२२ सकाळी १० ते दुपारी १. रत्नागिरीत जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात ही कार्यशाळा होईल. दोन्ही दिवसांचे प्रवेश शुल्क १०० रुपये असून नावनोंदणी 9422473080 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply