रत्नागिरी : येत्या १० आणि ११ जून रोजी रत्नागिरीत उज्ज्वला वसंत भिडे यांच्या स्मृती तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत होणारी ही पहिलीच स्पर्धा आहे. रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळाच्या नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेला रोख रक्कम आणि इतर उत्तेजनार्थ परितोषिके दिली जातील. खुल्या आणि विविध गटांमध्ये एकूण पंधरा हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील बुद्धिबळपटूंना क्लासिकल प्रकारात बुद्धिबळ खेळण्याची ही चांगली संधी आहे. तालुक्यातील प्रथम नाव नोंदविणाऱ्या ३२ खेळाडूंनाच स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी चैतन्य भिडे (८०८७२२००६७), मंगेश मोडक (९४०५३५२३५६) किंवा विवेक सोहनी (९४२२४७४५४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड