जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे गुहागरमध्ये आयोजन

रत्नागिरी : गुहागर येथील व्याडेश्वर कॅरम क्लबने जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा येत्या २९ आणि ३० जुलै रोजी आयोजित केली आहे. स्पर्धा गुहागरमध्ये खालचा पाट येथील मराठी शाळेजवळ भंडारी भवनात होणार आहे.

स्पर्धेत ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेतील गुणावर येत्या ४ ते ७ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडला जाईल.

स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी आणि वयस्क पुरुष एकेरी अशा ४ गटांत होणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन राष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कॅरम
फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही चौथी जिल्हा कॅरम
स्पर्धा असून खेळाडूंनी २०२३-२४ या वर्षाचे ५० रुपये नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५०, तर पुरुष दुहेरी गटासाठी प्रत्येकी ३०० रुपये प्रवेश शुल्क राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका आल्या नाहीत, तर त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच सचिन बंदरकर आणि राज्यस्तरीय पंच मंदार दळवी यांची निवड करण्यात आली आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका येत्या २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह सादर कराव्यात. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी पांढरा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.

प्रवेशिका सादर करण्यासाठी गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), राहुल भस्मे (९६५७६३७६७८), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९९३०३०६५२५), लांजा – विकास इंदुलकर (९४०३७६९४४९), खेड – योगेश आपटे (०९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (२४०३७६८३७६) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचयअण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते सदस्य प्रदीप परचुरे, मिलिंद शेट्ये, नीलेश गोळे, सचिन साखरकर, उमेश जोशी, संदीप देवकर आणि मंगेश खोत व्याडेश्‍वर कॅरम क्लबच्या सदस्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply