रत्नागिरी : कोकणातील सुप्रसिद्ध स्पर्धापरीक्षा केंद्र आ. रा. स. अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन ॲण्ड करिअरचे येथील मंथनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
रत्नागिरीतील मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्टच्या मंचावर ॲड. राकेश सत्त्वे यांचे “स्वची ओळख – आजच्या करिअरची गरज” या विषयावर मार्गदर्शन झाले. ॲड. सत्वे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. स्क्रीनवर सादरीकरण करून त्यांनी ‘स्व’ची ओळख कोणत्याही करिअरमध्ये किती गरजेची आणि महत्त्वाची असते ते समजावून सांगितले. त्यांनी काही नामवंत व्यक्तींची उदाहरणे देऊन सादरीकरण केले. आजच्या करिअरच्या यशामध्ये नक्की कोणत्या गोष्टीची गरज आ,हे हे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या विविध गुणकौशल्यांचे त्यांनी कौतुक केले. कोणतेही करिअर निवडताना आपल्याला स्वतःची ओळख असणे किती आवश्यक आहे, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. स्वची ओळख आणि आजच्या करिअरचे महत्त्व हे एक वेगळा अनुभव देणारे सेमिनार ठरले.
प्रा. संदेश पालये यांनी सत्त्वे सरांची ओळख करून दिली आणि रोपटे देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी मुंबईहून ॲड. सुनील भडेकर, श्री. सावंत, प्रा. प्रतीक्षा पांचाळ आदी उपस्थित होते.
- संदेश पालये,
मंथन स्कूल ऑफ आर्ट,
मुरलीधर मंदिरासमोर,
खालची आळी, रत्नागिरी
(संपर्क : 95270 08676)



