गगनबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

तळेरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे आज (४ सप्टेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून गगनबावडा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. ती दरड मोठ्या प्रमाणावर असून, ती हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. सायंकाळी चारपर्यंत ते काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असा अंदाज आहे. सध्या वाहतूक फोंडाघाटमार्गे वळवण्यात आली आहे.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply