तळेरे-गगनबावडा महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत बंद

तळेरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या गगनबावडा घाटात काल (चार सप्टेंबर) सकाळी ८ वाजता मोठी दरड कोसळून वाहतूक बंद झाली होती. ती दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. काल सायंकाळी काम थांबवण्यात आले आणि आज सकाळी पूर्ण दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान घाटात काही ठिकाणी उभे तडे गेले आहेत. त्या ठिकाणी सैल खडकांचे सैलकरण करण्याचे काम करण्यासाठी तज्ज्ञ समिती येणार आहे. हे काम पूर्ण व्हायला आठ दिवस लागणार असल्याने तळेरे-गगनबावडा मार्ग १२ साप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. सैलकरणाचे काम केल्याने भविष्यात दरडी कोसळण्याची शक्यता कमी होईल. दरम्यान या ठिकाणाहून होणारी वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply