आर्ट सर्कल फाउंडेशनतर्फे शनिवार-रविवारी दोन नाटके

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल फाउंडेशनतर्फे दोन दिवसीय नाट्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ललित कला केंद्र निर्मित ‘इथेच टाका तंबू’ नाटक ७ फेब्रुवारीला, तर सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान, नाशिकनिर्मित ‘तो राजहंस एक’ नाटक ८ फेब्रुवारीला सादर होणार आहे.

या दोन्ही नाटकांच्या निमित्ताने तरुण लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी रत्नागिरीत येत आहे. आई कुठे काय करते या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला गुणी अभिनेता ओंकार गोवर्धन ‘ इथेच टाका तंबू ‘ या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेत नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासारदेखील या नाटकात मुख्य भूमिकेत आहे. तुला पाहते रे या मालिकेतून झेंडेच्या भूमिकेत दिसलेले ज्येष्ठ अभिनेते उमेश जगताप आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेले अमेय बर्वे अशी या नाटकाची तगडी स्टारकास्ट आहे.

दुसऱ्या दिवशी, ८ रोजी तो राजहंस एक नाटकाच्या निमित्ताने प्राजक्त देशमुख याला अभिनेता म्हणून रंगमंचावर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या जोडीला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका अर्थात अनिता दाते असेल. देवबाभळीसारख्या जबरदस्त नाटकाने प्राजक्त यांनी आपली लेखणी सिद्ध केली आहे. त्यांची लेखणी जितकी सशक्त आहे तितकाच अभिनयही सशक्त आहे. तो राजहंस’मधून पाहायला मिळणार आहे.

या दोन्ही नाटकांमधील सर्व कलाकार मराठी रंगभूमीशी नाळ जोडलेले आहेत. गेली अनेक वर्षे विविध प्रयोग ते करत आहेत. दैनंदिन मालिकांमुळे ही सर्व मंडळी घराघरात पोहोचली आहेत.

या दोन्ही नाटकांचे लेखक दत्ता पाटील आणि सचिन शिंदे रंगभूमीवरील प्रयोगशील कलावंत म्हणून ओळखले जातात. आजवर अत्यंत संवेदनशील विषयांना त्यांनी रंगभूमीवर आणले आहेत.
या दोन्ही नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकांना अप्रतिम नाट्यानुभव मिळणार आहे. सभासदांना ही नाटके विनामूल्य पाहता येणार आहेत, तर अन्य सर्वांसाठी अतिशय अल्प दरात देणगीमूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत. बैठक व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.त आली आहे.
…………

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply