रत्नागिरी : बाविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून रत्नागिरीतील दामले विद्यालयाच्या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला.
स्पर्धेत अभिरुची, कोल्हापूर या संस्थेच्या ठोंब्या या नाटकाला प्रथम, अलंकार कला अकादमी फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या चेटकिणीच्या बंगल्यात या नाटकास द्वितीय, तर रत्नागिरीतील दामले विद्यालयाच्या काय ते जुनं या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला.
सिटी हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकाला चौथे, तर श्री कांतीलाल पुरुषोत्तम दास शाह प्रशाला इंग्लिश मीडियम सेकंडरी युनिट, सांगली संस्थेच्या द कॅसलिंग या नाटकासाठी पाचवे पारितोषिक मिळाल्याचीच घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पाचही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल असा – दिग्दर्शन – प्रथम – जितेंद्र देशपांडे (नाटक- ठोंब्या), द्वितीय – शाहबाज गोलंदाज (नाटक- काय ते जूनं), तृतीय शिरीष विचारे (नाटक-चेटकिणीच्या बंगल्यात), प्रकाशयोजना प्रथम – श्याम चव्हाण (नाटक- वारी), द्वितीय – अभिषेक कोयंडे (नाटक- लगोरी), तृतीय – धीरज पलसे (नाटक- द कॅसलिंग), नेपथ्य: प्रथम – सागर सगरे (नाटक-जंगल स्कूल) द्वितीय – निरंजन सागवेकर (नाटक-काय ते जूनं), तृतीय – अरुण पाटील (नाटक-बीज अंकुरले), रंगभूषा : प्रथम – सुशांत सावंत (नाटक- मैत्र जिवांचे), द्वितीय – सागर सगरे (नाटक- जंगल स्कूल), तृतीय – दीपा कोळी (नाटक- भुताचा बाप), वेशभूषा प्रथम – नीलिमा ग्रामोपाध्ये (नाटक-राजकन्येची बाहुली), द्वितीय – वेदा सोनुले (नाटक-चेटकीणीच्या बंगल्यात), तृतीय – रमेश यळगूडकर (नाटक- आमची काय चूक ?), संगीत दिग्दर्शन: प्रथम – आर्या पोटे (नाटक-व्हॉट्सअॅपचा तमाशा), द्वितीय – हर्ष नागवेकर (नाटक-धोंड), तृतीय – आप्पा गावडे (नाटक-वारी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक आरव गुळवणी (नाटक- ठोंब्या) व विदुला मुळ्ये (नाटक-धोंड), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – आरोही गुळवणी (नाटक-चेटकिणीच्या बंगल्यात), स्वरा मेंडगुले (नाटक-झिम्माड झिम), विभा शिंदे (नाटक- बीज अंकुरले), सावी मुद्राळे (नाटक-लगोरी), इंद्रजा पटवर्धन (नाटक-द कॅसलिंग), अजिंक्य पोटे (नाटक-व्हॉट्सअॅपचा तमाशा), हितेश राजबंसी (नाटक-सर तुम्ही गुरुजी व्हा), अर्णव सरपोतदार (नाटक-काय ते जुनं), दर्शन कांबळे (नाटक-तीन पाहुणे) रियांश चव्हाण (नाटक- उंदिर मामाची जादूची दुनिया).
गेल्या ५ जानेवारी ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत कोल्हापूरच्या गायन समाज देवल क्लबमध्ये अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ४९ बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गिरीश भुतकर, हनुमान सुरवसे आणि श्रीमती वैदेही चवरे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांनीही पारितोषिकप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.

बालनाट्य – धोंड
संस्था – पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी

बालनाट्य – काय ते जुनं
संस्था – दामले विद्यालय, रत्नागिरी

बालनाट्य – काय ते जुनं
संस्था – दामले विद्यालय, रत्नागिरी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

