रत्नागिरी : शास्त्रीय गायनासाठी योग्य आणि प्रभावी रियाज कसा करावा, याबाबत येथील खल्वायन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा लाभ नवोदित कलाकारांना झाला.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजने प्रायोजित केलेली ही कार्यशाळा भगवान परशुराम सभागृहात पार पडली. मुंबईच्या प्रसिद्ध गायिका व गुरू विदुषी भाग्यश्री देशपांडे (संगीत अलंकार, एमए – म्युझिक) यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. आवाज चांगला होण्यासाठी काय करावे, स्वर रियाज आणि अलंकार कसे म्हणावेत, श्वासोच्छ्-वासावर नियंत्रण कसे मिळवावे, शास्त्रीय गायन, चित्रपटासाठी गायन, भजनातील गायन, नाट्यसंगीत गायन यासाठी वेगवेगळा रियाज कसा करावा, आवाजातील दोष कसे घालवावेत आणि दररोज रियाज कधी करावा इत्यादीबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत रत्नागिरी व आजूबाजूचा परिसर तसेच संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, राजापूर आणि गोव्यातून ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. उत्तम मार्गदर्शन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

