रत्नागिरी जिल्ह्यात १५ जानेवारीला निवडणूक होणार असलेल्या ४७९ ग्रामपंचायती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तेथे १५ जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची नोटीस येत्या १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सार्वजनिक सुट्टी वगळून इतर दिवशी सादर करता येऊ शकतील. अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला होणार असून अर्ज माघारीचे अर्ज ४ जानेवारीपर्यंत सादर करता येतील. त्याच दिवशी निवडणुकीतील प्रत्यक्ष उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. मतदान १५ जानेवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी १८ जानेवारीला होणार असून निकालाची अधिसूचना २१ जानेवारीला प्रसिद्ध होईल.

रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुका होणार असलेल्या तालुकानिहाय ४७९ ग्रामपंचायती अशा –
मंडणगड (१५) – उमरोली, चिंघर, कादवण, पाट, भोळवली, पालवणी, पेवे, सावरी, घोसाळे, पालघर, शिरगाव, जावळे, गोठे, म्हाप्रळ मोहल्ला, वेळास.

दापोली (५७) – साखळोली, पोफळवणे, शिवाजीनगर साखळोली, कात्रण, दाभोळ, हर्णै, शिरसोली, आवाशी, महाळुंगे, शिरखल, पालगड, बुरोंडी, गिम्हवणे, आंबवली, शिवाजीनगर, रुखी, आंजर्ले, केळशी, कर्दे, कोंढे, कोळथरे, खेर्डी, गव्हे, चिखलगाव, जामगे, नवशी, मुगीज, मुरूड, वणौशी तर्फ पंचनदी, शिरवणे, पांगरी तर्फ हवेली, इळणे, आडे, गुडघे, कुंभवे, लाडघर, भोपण, मौज दापोली, पाडले, पंचनदी, पिसई, टांगर, उन्हवरे, अडखळ, असोंड, आसूद, कोंगळे, चंद्रनगर, ताडील, दाभिळ, पन्हाळेकाझी, विसापूर, सुकोंडी, वाकवली, ओणनवसे, टेटवली, वडवली.

खेड (८७) – चिरणी, सोनगाव, सापिर्ली, धामणंद, पोसरे बुद्रुक, वावे तर्फ खेड, तळवटपाल, सात्विणगाव, आवाशी, गुणदे, शिरगाव, नांदिवली, हुंबरी, कळंबणी खुर्द, शिव बुद्रुक, दयाळ, घेरारसाळगड, काडवली, मुसाड, साखर, कुळवंडी, सवेणी, ऐनवरे, आंबवली, वरवली, बिजघर, कुंभाड, शेल्डी, आष्टी, लवेल, दाभिळ, आंजणी, लोटे, कुरवळ जावळी, चोरवणे, आंबडस, धामणदिवी, कर्टेल, कावळे, कासई, पन्हाळजे, तुंबाड, कर्जी, शिंगरी, कुडोशी, कसबा नातू, तिसे, भडगाव खोडे, वेरळ-जांबुर्डे, कोतवली, शिरवली, उधळे बुद्रुक, हेदली, मुरडे, आबये, चाकाळे, शिवतर, जामगे, चिंचघर, साखरोली, पोयनार, फुरूस, सुकदर, धामणी, भिलारे आयनी, घेरापालगड, भरणे, तुळशी खुर्द, बोरघर, खवटी, कशेडी, तळे, मोगाने किंजळे तर्फ नातू, मुंबके, कोरेगाव, शेलवल, मोरवंडे, होडखाड, माणी, मिर्ले, मेटे, केळणे.
चिपळूण (८३) – येगाव, वाघिवरे, दुर्गवाडी, पोसरे, निवळी, पिलवली तर्फ वेळंब, खोपड, कोसबी, कुडप, कुशिवडे, कौंढरताम्हाणे, रामपूर, फुरूस, मार्गताम्हाणे खुर्द, कात्रोळी, चिवेली, भोम, गांग्रई, आकले, नांदिवसे, खडपोली, मोरवणे, आगवे, खेरशेत, पालवण, कुटरे, तळवडे, वेहेळे, कळमुंडी, खेर्डी, निरबाडे, रिक्टोली, कळंबट, कादवड, कोंडफणसवणे, कोंढे, मिरजोळी, कोंडमळा, सावर्डे, कळवंडे, खरवते, पाचाड,ओवळी, तिवडी, तिवरे, पेढांबे, पिंपळी खुर्द, पिंपळी बुद्रुक, नागावे, कान्हे, अनारी, मुर्तवडे, दळवटणे, वालोटी, कळंबस्ते, कोकरे, ढोक्रवली, अलोरे, तनाळी बुद्रुक, मुंढे तर्फ सावर्डा, बोरगाव, वडेरू, उभळे, शिरळ, कापसाळ, दहिवली बुद्रुक, दहिवली खुर्द, मालघर, रेहेळे वैजी, मुंढे तर्फे चिपळूण, तळसर, कुंभार्ली, तुरंबव, तोंडली, पिलवली तर्फे सावर्डे, वीर, ताम्हणमळा, धामणवणे, चिंचघरी, नायशी.

गुहागर (२९) – कोंडकारूळ, रानवी, भातगाव, शिर, वेळणेश्वर, मळण, पालपेणे, तळवली, निगुंडळ, नरवण, पिंपर, जामसूत, शिवणे, कुडली, उमराठ, पेवे, काताळे, पडवे, कोसबीवाडी, गोळेवाडी, काजुर्ली, मासू, अडूर, मुंढर, खामशेत, साखरी बुद्रुक, साखरी आगर, कोळवली, गिमवी.

संगमेश्वर (८१) – डावखेल, हातीव, कोंड्ये, मुरादपूर, परचुरी, पांगरी, साडवली, कोसुंब, ताम्हाणे, निवे बुद्रुक, मेढे तर्फे फुणगूस, डिंगणी, घोडवली, काटवली, नांदळज, उजगाव, वायंणे करंबेळे तर्फे संगमेश्वर, मांजरे, नावडी, लोवले, कुरधुंडा, फणसवळे, विघ्रवली, सायले, सोनवडे, तेऱ्ये, कोंडकदमराव, वाशी तर्फे देवरूख, पूर, ओझरे खुर्द, देवळे, चाफवली, दाभोळे, देवडे, बोंड्ये, किरबेट, निवे खुर्द, भडकंबा, चोरवणे, आंगवली, कासारकोळवण, मारळ, बामणोली, खडीकोळवण, तिवरे तर्फे देवळे, पुर्ये तर्फे देवळे, मुर्शी, वांझोळे, मोर्डे, हरपुडे, बेलारी बुद्रुक, घाटिवळे, कनकाडी, कसबा संगमेश्वर, कोंडिवरे, तिवरे घेरा प्रचीतकड, कारभाटले, नायरी, नारडुवे, आंबेड खुर्द, आरवली, धामणी, गोळवली, कुचांबे, मासरंग, मुरडुव, पाचांबे, राजवाडी, उमरे, अंत्रवली, कळंबस्ते, कुंभारखाणी खुर्द, करजुववे, बुरंबाड, कडवई, चिखली, रांगव, धामापूर तर्फे संगमेश्वर, कुंभारखाणी बुद्रुक, पिरंदवणे.

रत्नागिरी (५३) – झरेवाडी, गडनरळ, खरवते, हरचिरी, चिंद्रवली, सोमेश्वर, ओरी, चवे, गणपतीपुळे, हातखंबा, कासारी, मजगाव, नांदिवडे, सैतवडे, वरवडे, कर्ला, जांभरूण, कळझोंडी, कशेळी, गावखडी, पावस, आगरनरळ, बसणी, भाट्ये, चांदेराई, चाफे, देऊड, डोर्ले, दांडेआडोम, गोळप, काळबादेवी, कापडगाव, कोळंबे, कुरतडे, खालगाव, खेडशी, खानू, मिरजोळे, मिऱ्या, नाचणे, नाखरे, नाणीज, नेवरे, पानवळ, पाली, राई, रीळ, शिवारआंबेरे, वाटद, कोतवडे, सडामिऱ्या, उक्षी, गुंबद.

लांजा (२३) – पालू, जावडे, खोरनिनको, पन्हळे, वाघणगाव, विवली, वनगुळे, गोळवशी, साटवली, वाडगाव, हर्दखळे, आंजणारी, माजळ, कणगवली, आसगे, इसवली, बेनी खुर्द, कोलेवाडी, रावारी, आडवली, भांबेड, विलवडे, इंदवटी.

राजापूर (५१) – पन्हळे तर्फे सौंदळ, शिवणे खुर्द, अणसुरे, महाळुंगे, मंदरूळ, आंबोळगड, ओशिवळे, दोनिवडे, धोपेश्वर, गोठणे दोनिवडे, कारवली, कोळंब, कुवेशी, सौंदळ, शीळ, येरडव, कोंडिवळे, वाल्ये, कोंडसर बुद्रुक, चुनाकोळवण, कशेळी, ओणी, गोवळ, हातदे, हरळ, जवळेथर, काजिर्डा, कोदवली, मोरोशी, निवेली, पडवे, परटवली, ससाळे, तुळसवडे, पांगरी खुर्द, तारळ, आडवली, चिखलगाव, दळे, करक, कुंभवडे, मोसम, मिळंद, पांगरी बुद्रुक शेंबवणे, सोलगाव, तळगाव, ताम्हाणे, वाडापेठ, फुफेरे, उन्हाळे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply