रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ आणि श्री रवळनाथ देवस्थान ट्रस्टने संयुक्तपणे गोळप (ता. रत्नागिरी) या ग्रामीण भागात राबविलेल्या नेत्रशिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना डोळे या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे भविष्यात दृष्टिदोष होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी सुरुवातीपासून सर्वांनी सजगतेने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख अविनाश काळे यांनी यावेळी केले. ग्रामीण भागात मोफत मोतिबिंदू शिबिरासारखे उपक्रम राबिवल्यामुळे जनजागृती होतेच पण अनेक जणांना याचा फायदा होत असल्याने डोळ्यांच्या पुढील समस्या कमी होण्यास मदत होते. याबाबत लायन्स आय हॉस्पिटल खूप चांगले काम करत आहे.
लायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्र तपासणी केली. आडिवरे, गावखडी पावस, वायंगणी, गोळप इत्यादी भागातील ५० जणांची नेत्र तपासणी करून घेतली. आवश्यक त्यांना सवलतीत चष्मे देण्यात आले. त्यामध्ये १५ मोतीबिंदू रुग्णांची मोफत ऑपरेशन लायन्स आय हॉस्पिटलमध्ये होणार आहेत.
यावेळी अनुलोमचे भागजनसेवक रवींद्र भोवड, जनसेवा सामाजिक मंडळाचे सचिव समित घुडे, सहसचिव प्रकाश संते, महेश पालकर, रवळनाथ देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर सुर्वे, उपाध्यक्ष बंधू वारिशे, सचिव सुहास बापट, देवस्थानचे प्रमुख गावकर सुरेश राड्ये, विश्वस्त राजन पाटणकर, गोळप पोलीस पाटील नीलेश भाटकर, धोपटवाडी पोलीस पाटील राजेंद्र उभारे, सदस्य राजेश पावसकर आदी उपस्थित होते. गावात नेत्रशिबिर घेऊन मोफत ऑपरेशनची सोय केल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media