रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवारी) १५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज १६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ८२८ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.१४ टक्के आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १५ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ८४३ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.२४ टक्के आहे.
जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार गुहागरमध्ये ४, रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर येथे प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ७). एकूण रुग्णांची संख्या आता नऊ हजार ८८५ झाली आहे. आज आणखी १६६ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार १९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आज एकही मृत्यू नोंदविला गेला नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३२ एवढीच राहिली आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५७४ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ९४४ एवढी झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १६० एवढीच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

