रत्नागिरी/सिंंधुुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उद्या (दि. ८ जानेवारी) करोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे. रत्नागिरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आणि सिंधुदुर्गनगरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या निर्देशांनुसार हे लसीकरण करण्यात येणार आहे. देशभरात सर्वत्र ८ जानेवारीला रोजीच करोना लसीकरणाबाब तड्राय रन घेतली जाणार आहे.
रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, हातखंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दापोली उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची ड्राय रन म्हणजे रंगीत तालीम होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कासार्डे आणि देवगड अशा तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.
रत्नागिरीत १३ जानेवारीला करोनाची लस दाखल होणार
रत्नागिरी जिल्ह्यात १३ जानेवारी रोजी करोनाची लस दाखल होण्याची शक्यता असून ही तारीख वरिष्ठ पातळीवर आरोग्य विभागाला देण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांनी दिली.

