रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात १२ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर २० जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एक, चिपळूण तालुक्यात तीन आणि लांजा तालुक्यात दोन नवे बाधित रुग्ण आढळले. (एकूण ७) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९४७० झाली आहे. आज आणखी १३६८ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६७ हजार १२७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७३ आहे. त्यातील सर्वाधिक २६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर १७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज २० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०३१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.३६ टक्के झाला आहे. आज जिल्ह्यात दोन मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या ३४५ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे. खेड तालुक्यातील ७५ वर्षांच्या पुरुषाचा २४ जानेवारीला, तर खेड तालुक्यातीलच ६४ वर्षांच्या पुरुषाचा २५ जानेवारीला सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२५ जानेवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, १२ नवे करोनाबाधित आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६१६६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५७८६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply