झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय पाचवा – भाग ४

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय पाचवा – कर्मसंन्यास

कोणाचेंही काय । पापपुण्य पाहीं ।।
देव घेत नाहीं । शिरावरी ।।१२।।

ज्ञान झाकिलेंसे । अज्ञानानें सर्व ।।
तेणें मोह जीव । पावतसे ।।१३।।

ज्ञानें दग्ध ज्यांचे । पापांचे प्रकार ।।
त्यांची येरझार । संपलीच ।।१४।।

Chapter 5 – Actions leftover

And nobody’s deed । Virtuous or misdeed ।
God does not indeed । Take upon himself ।।12।।

And when erudition । Is shaded by incomprehension ।
Surely then illusion । Comes to creatures ।।13।।

Knowledge burns out । Whose sins throughout ।
Are freed from, no doubt । Birth-death cycle ।।14।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ पञ्चमोऽध्यायः । संन्यासयोगः

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥५-१५॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥५-१६॥

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥५-१७॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply