रत्नागिरीत ७, सिंधुदुर्गात नवे ९ करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन फेब्रुवारी) करोनाचे नवे सात रुग्ण आढळले, तर पाच जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे ९ रुग्ण आढळले, तर १६ रुग्ण करोनामुक्त झाले. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन फेब्रुवारी) आरटीपीसीआर चाचणीनुसार, चिपळूण तालुक्यात दोन, संगमेश्वर तालुक्यात तीन नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात दोन नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ७) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९५८१ झाली आहे. आज आणखी २११ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७२ हजार ६८३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११० आहे. त्यातील सर्वाधिक ३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ५ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१०३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.०१ टक्के झाला आहे. मृतांची एकूण संख्या ३५० असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ९ नवे करोनाबाधित आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२६२ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५८७९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोलझर (ता. दोडामार्ग) येथील ५२ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६७ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply