रत्नागिरी जिल्ह्यात आज पुन्हा २७ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात चार नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत आजही वाढ झाली असून, आज (२१ फेब्रुवारी) करोनाचे नवे २७ रुग्ण आढळले, तर ७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४ रुग्ण आढळले आणि एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २७ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत १२, खेडमध्ये ६, चिपळूण तालुक्यात ३ रुग्ण आढळले. (एकूण २१). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत ३, संगमेश्वर तालुक्यात दोन, तर लांजा तालुक्यात १ बाधित रुग्ण आढळला. (एकूण ६). (दोन्ही मिळून २७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९८५६ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी २०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७७ हजार २५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३२ आहे. त्यातील सर्वाधिक ३८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात, तर त्याखालोखाल २५ रुग्ण कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ३३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९३१५ झाली आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजही कमी असल्याने करोनामुक्तीचा दर घटला असून, तो आता ९४.५१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज दोन मृत्यूंची नोंद झाली. संगमेश्वर तालुक्यातील ५२ वर्षांच्या महिलेचा २० फेब्रुवारीला, तर दापोली तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा २१ फेब्रुवारीला सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६२ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ४ करोनाबाधित आढळले. आज जिल्ह्यातील एकही जण करोनामुक्त झाला नाही. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३९१ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०३४ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply