झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय आठवा – भाग २

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय आठवा : अक्षरब्रह्म

जें कांहीं असाध्य । अन्य साधनांनीं ।।
दृढ चिंतनांनी । साध्य हो तें ।।५।।

आदीचा जो आदी । तर्का तर्कवेना ।।
ज्ञाना आकळेना । श्रद्धेवीण ।।६।।

तुळितां जयासी । रवि फिक्का पडे ।।
असे पलीकडे । अंधाराच्या ।।७।।

परपुरुषा या । भावें चिंती जो तो ।।
अंतीं तो पावतो । दिव्यरूपा ।।८।।

Chapter 8 – The Holy Utterance

What can’t be reached । Any way indeed ।
That can be achieved । By deep meditation ।।5।।

Root of origination । Beyond speculation ।
Difficult comprehension । Without faith ।।6।।

His glorious distinction । Outshines the Sun ।
Lives mysteriously hidden । Beyond blackness ।।7।।

The mankind devoting । The supreme being ।
Attains in the ending । Divine state ।।8।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ अष्टमोऽध्यायः । अक्षरब्रह्मयोगः

श्रीभगवानुवाच ।

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥८-८॥

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयंसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥८-९॥

प्रयाणकाले मनसाऽचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥८-१०॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply