कीर्तनसंध्याच्या यूट्यूब प्रसारणाला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सादरीकरण शक्य नसल्याने दशकमहोत्सवी कीर्तनसंध्याचे प्रसारण यावर्षी कालपासून (दि. २१ फेब्रुवारी) यूट्यूबवर प्रसारण करण्यात आले. त्याला कीर्तनप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

सलग दहा वर्षे एक कीर्तनकार, एक आयोजन समिती, एक साउंड सिस्टीम आणि एक सलग विषय ही वैशिष्ट्ये असलेला आणि कीर्तनाच्या गर्दीचे उच्चांक मोडणारा रत्नागिरीतील कीर्तनसंध्या हा राज्यभरातील एकमेव उपक्रम ठरला आहे. यावर्षी “कीर्तनसंध्या”ची दशकपूर्ती आहे. त्यानिमित्ताने कारगिल युद्ध आणि त्यात पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्यांची गाथा हा आख्यानाचा प्रमुख विषय आहे. देशरक्षणासाठी आपले अवघे आयुष्य स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्यांच्या असीम त्यागाला यंदाची कीर्तनसंध्या अर्पण करून कालपासून कीर्तनसंध्याच्या ऑनलाइन सादरीकरणाला काल सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशी या चॅनेलला नव्या एक हजार सबस्क्रायबरनी पसंती दिली, तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचा लाभ साडेचार हजार कीर्तनप्रेमींनी घेतला. कीर्तनसंध्याच्या उपक्रमासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

पहिल्या दिवसाच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि कीर्तनप्रेमींच्या विनंतीचा विचार करून यूट्यूबवरील पहिल्या दिवसाची लिंक मंगळवार, २३ फेब्रुवारीपर्यंत खुली राहणार आहे. मात्र त्यानंतरच्या दिवसांच्या लिंक २४ तासांसाठीच खुल्या राहणार आहेत. शेवटच्या, पाचव्या दिवसाची २६ फेब्रुवारी रोजी अपलोड होणारी लिंक मात्र त्यापुढील दोन दिवस म्हणजे रविवार, २८ फेब्रुवारीपर्यंत यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे.
कीर्तनसंध्या रत्नागिरी
योद्धा भारत (कारगिल यु्द्ध,
सादरकर्ते – राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवा) या कीर्तनाचा पहिला
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

• कीर्तन कसे पाहाल?
१) सोबत दिलेल्या https://www.youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA या Link वर Click करा.
२) लाल अक्षरातील Subscribe वर Click करा.
३) त्याच्या उजवीकडील Bell Icon वर Click करून All हा पर्याय निवडा.
४) कीर्तनाच्या दिवशी कीर्तन सुरू होण्याच्या वेळी YouTube वर Kirtansandhya Ratnagiri असा Search करून Live कीर्तन पाहता येईल.
(नोंद: पहिल्या ३ सूचनांचे पालन केल्यास कीर्तनाची Notification आपोआप येईल.)

• संपर्क:
कोणतीही शंका असल्यास खालील क्रमांकांवर शक्यतो WhatsApp द्वारे संपर्क करा.
अवधूत जोशी – 9011662220

कीर्तनसंध्याच्या यूट्यूब चॅनेलची https://www.youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA ही लिंक आहे. त्यावरून सर्वांनी कीर्तने पाहावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
………..

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply