रत्नागिरीत १८ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ फेब्रुवारी) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर २० जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ६, तर चिपळुणात ११ बाधित रुग्ण आढळले. (एकूण १७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९९५५ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ३२० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ८० हजार ११९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १४४ आहे. त्यातील सर्वाधिक ४२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. ५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज २० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९४२५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६४ एवढीच असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply