रत्नागिरीत १४, सिंधुदुर्गात करोनाचे नवे २० रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (४ मार्च) करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार ४१ झाली आहे. आज २१ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे २० बाधित आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. एकाचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत १, खेड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी २, गुहागरला ३, तर चिपळूणला ५ (एकूण १३) रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार खेडमध्ये एक बाधित आढळला. (दोन्ही मिळून १४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ४१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८२ हजार २५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १७५ आहे. त्यातील सर्वाधिक ४२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ४८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २१ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९५२५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.८६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६७ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (४ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे २० करोनाबाधित आढळले, तर ३ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४८० झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६१३१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गिर्ये (ता. देवगड) येथील ५० वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७४ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply