रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (९ मार्च) करोनाचे नवे ३१ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार १४९ झाली आहे. आज ३६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १५ बाधित रुग्ण आढळला, तर १० जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ३१ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ७, चिपळूणला १४, मंडणगड आणि राजापूरमध्ये प्रत्येकी १, तर संगमेश्वर तालुक्यात दोन बाधित आढळले. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी १, दापोली आणि खेड तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ३१). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार १४९ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५६८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८५ हजार २८४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १५८ आहे. त्यातील सर्वाधिक ४५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ७५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ३६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९६०२ झाली आहे. नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने करोनामुक्तीचा दर ९४.६१ टक्के झाला आहे.
जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राजापूर तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६९ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात आज (९ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज नवे १५ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६५२७ झाली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६१८० झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालवण येथील ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू गेल्या ४ जानेवारी रोजी गोव्यात गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झाला. त्याची नोंद आज झाली. त्या महिलेसह जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७६ झाली आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
