रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ मार्च) करोनाचे नवे १९ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार २४१ झाली आहे. आज १७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ नवे रुग्ण आढळले, तर ५ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २, खेड आणि चिपळूण प्रत्येकी ८ आणि संगमेश्वर १ (एकूण १९). आज रॅपिड अँटिजेन टेस्ट झाल्या नाहीत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार २४१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४७३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८८ हजार ७८९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १४५ आहे. त्यातील सर्वाधिक ४० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ६९३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६५ टक्के आहे.
जिल्ह्यातील मृतांची संख्या ३७० असून मृत्युदर ३.६१ टक्के आहे.
लसीकरणाचे प्रमाण ३८ टक्के
दरम्यान, जिल्ह्यात ७६ हजार ४२३ जणांना करोना प्रतिबंधाची पहिली, तर सहा हजार ७२३ जणांना दुसरी लस देण्याचे नियोजन होते. त्यापैकी २५ हजार ६९० जणांना पहिली, तर सहा हजार ५४१ जणांना दुसरी लस देण्यात आली असून हे प्रमाण ३८ पूर्णांक ७६ शतांश टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात आज (१५ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज ५ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार २५२ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६०१ झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७७ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
