रत्नागिरी, सिंधुदुर्गात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज (१७ मार्च) नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या किंचित अधिक आहे. रत्नागिरीत नवे १८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे १८ रुग्ण आढळले, तर २० जण बरे होऊन घरी गेले. दोन्ही जिल्ह्यांत मृतांची नोंद आज झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ५, दापोली आणि मंडणगड प्रत्येकी १, चिपळूण ४, संगमेश्वर आणि राजापूर प्रत्येकी २ (एकूण १५), रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १ आणि दापोली २ (दोन्ही मिळून १८) रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार २७० झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५१७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८९ हजार ७१२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०८ आहे. त्यातील सर्वाधिक ३४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ४९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ७६६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.०९ टक्के आहे.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांचा आकडा ३७० एवढाच असून मृत्युदर ३.६० टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (१७ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार २० जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावरमुक्त झालेल्यांची संख्या ६ हजार २८१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६३४ एवढी झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७७ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी त्यांच्या दैनंदिन अहवालात दिली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply