रत्नागिरीत करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, सापडले ५५ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ मार्च) करोनाची स्थिती आणखी गंभीर बनली आहे. आज नवे ५५ रुग्ण आढळले, तर केवळ २० रुग्ण करोनामुक्त झाले. सर्वाधिक १८ रुग्ण चिपळूण तालुक्यात सापडले आहेत. सिंधुदुर्गात नवे १७ रुग्ण सापडले, तर तेवढेच करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि लांजा प्रत्येकी २, दापोली १, खेड १०, गुहागर ३, चिपळूण १८, राजापूर ११ (एकूण ४७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ४, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर प्रत्येकी २. (एकूण ८). (दोन्ही मिळून ५५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ४२० झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४८२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९२ हजार १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १८९ आहे. त्यातील सर्वाधिक ५७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ८४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ८१८ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.२२ टक्के आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.५६ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (२१ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज १७ नवे रुग्ण आढळले, तर तेवढेच करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ६ हजार ७०९, तर करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ३२६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७९ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply