रत्नागिरीत ३६, सिंधुदुर्गात १४ करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ मार्च) करोनाचे नवे ३६ रुग्ण आढळले, तर केवळ १७ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गातही नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांचे प्रमाण कमीच आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८, खेड ११, चिपळूण १, संगमेश्वर ३, मंडणगड आणि राजापूर प्रत्येकी २ (एकूण २७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २, दापोली ६, चिपळूण १ (एकूण ९). (दोन्ही मिळून ३६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ४५६ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४९४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९२ हजार ५१२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २०४ आहे. त्यातील सर्वाधिक ५६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ९८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ८३५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.०६ टक्के आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.५५ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १०, तर एकूण ६ हजार ३३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६७२३ झाली आहे, तर आतापर्यंत जिल्ह्यात १७९ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply