रत्नागिरी, सिंधुदुर्गात करोनाचा कहर, रत्नागिरीत १५५, सिंधुदुर्गात ७४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत करोनाचा कहर सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात (२ एप्रिल) नवे १५५, सिंधुदुर्गात ५४ रुग्ण आढळले. त्यामुळे रत्नागिरीतील सक्रिय रुग्णांची संख्या ५१९, तर सिंधुदुर्गातील सक्रिय रुग्णांची संख्या ५३५ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळले असून सर्वाधिक ५६ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले आहेत.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ३२, दापोली २, खेड ६, गुहागर २३, चिपळूण ३२, संगमेश्वर ११, मंडणगड १, लांजा आणि राजापूर प्रत्येकी २ (एकूण १११). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २४, दापोली ३, गुहागर ४, चिपळूण ३ आणि संगमेश्वर तालुक्यात ७ (एकूण ४४) बाधित आढळले. (दोन्ही मिळून १५५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार २६२ झाली आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६७३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख एक हजार ३६४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५१९ आहे. त्यातील सर्वाधिक ११४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३०९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार २०४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी घटला असून तो ९०.६० टक्के झाला आहे.

मृतांची संख्या ३७७ असून मृत्युदर ३.३५ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७२५० झाली आहे. जिल्ह्यात सध्या ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज १७, तर एकूण ६५२६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत जिल्ह्यात १८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply