रत्नागिरीत अभाविपतर्फे आंबेडकर जयंतीला रक्तदान शिबिर

रत्नागिरी : करोनाच्या प्रादुर्भावामुळे जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रत्नागिरीत येत्या बुधवारी (दि. १४ एप्रिल) आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची रत्नागिरी शाखा यांनी संयुक्तपणे या शिबिराचे आयोजन केले आहे. १८ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील इच्छुकांना रक्तदान करता येईल. रक्तदात्याचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असावे. रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण झोप झालेली असावी. जागरण करू नये. अॅस्पिरिन, पॅरासिटामॉल आणि इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतलेली नसावीत. रक्तदानाला येताना सकाळी पुरेसा आहार घेऊन यावे. रक्तदानाच्या दिवशी वा आधी ताप नसावा.

बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये होईल. रक्तदानाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी गुगलवरून आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता https://forms.gle/epwPxhJPat1SY2Hk8 या लिंकवर जाऊन अर्ज भरावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी (०२३५२-२२२३६३), राहुल (7028453531) किंवा अभाविप कार्यालय (8080244264) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply