रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचा पुन्हा उच्चांक, एकाच दिवशी ३३७ रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१३ एप्रिल) तीनशेची संख्या ओलांडली. आज ३३७ करोनाबाधित आढळले, तर १११ रुग्ण करोनामुक्त झाले. पाच जणांचा मृत्यू झाला. आज रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १४२ रुग्ण आढळले, तर मंडणगड तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९४, दापोली १४, खेड ३२, चिपळूण ५६, संगमेश्वर २२, लांजा १४, राजापूर ५. (एकूण २३७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ४८, दापोली २७, खेड ८, गुहागर ९, चिपळूण १, संगमेश्वर ३ आणि लांजा ४. (एकूण १००) (दोन्ही मिळून ३३७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १३ हजार २९७ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार १६४ आहे. त्यातील सर्वाधिक १४५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ४४९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार २३३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आजही पुन्हा कमी झाला असून तो ८४.४७ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ८९५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख आठ हजार ३९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात पाच जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यात कालच्या एका रुग्णाचा समावेश आहे. चौघांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर एकाचा खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तपशील असा –
१२ एप्रिल – रत्नागिरी, पुरुष (वय ५२). १३ एप्रिल – दापोली, पुरुष (८३), दापोली, पुरुष (६५). दापोली, पुरुष (५७), रत्नागिरी, महिला, (६५). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४०८ असून मृत्युदर ३.०६ टक्के आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply