रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (८ मे) सलग दुसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज नवे ४८४ करोनाबाधित आढळले, तर ६५३ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी, ८ मे, (हिं. स.) जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ६५, दापोली २६, खेड २१, गुहागर ९, चिपळूण ६७, लांजा २२ आणि राजापूर ३५ (एकूण २४५), तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १०१, दापोली १४, खेड ३३, गुहागर २३, चिपळूण २३, संगमेश्वर ३२, लांजा ७ आणि राजापूर ६ (एकूण २३९) (दोन्ही मिळून ४८४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २६ हजार ३८५ झाली आहे. आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार ७५१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ८२१ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ९०६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ६५३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या १९ हजार ८४३ झाली आहे. करोनामुक्तांची ही टक्केवारी ७५.२० टक्के आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे ५ आणि आजचे १३ अशा एकूण १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या सर्व १३ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७९१ झाली असून मृत्युदर २.९९ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २०१, खेड ९०, गुहागर ३२, दापोली ७४, चिपळूण १६३, संगमेश्वर ११६, लांजा ४७, राजापूर ६१, मंडणगड ७. (एकूण ७९१).
Follow Kokan Media on Social Media

