झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय अठरावा – भाग १०

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय अठरावा : मोक्षसंन्यासयोग

गेला किंवा नाहीं । मोह अर्जुना गा ।।
निजेला कीं जागा । सांग तरी ।।३७।।

प्रसादाने तुझ्या । आजी अच्युता रे ।।
स्मरण बा सारें । परतलें ।।३८।।

फिटला संदेह । लीन पदीं झालों ।।
देवा ! तुज आलों । शरण मी ।।३९।।

श्रीकृष्ण-पार्थांचा । संवाद अद्भुत ।।
तुज यथाभूत । निवेदीला ।।४०।।

Chapter 18 – Accomplishment Of Sacrifice

Tell me whether । Illusion is clear ।
Or still the fear । Lives in mind ।।37।।

Then Arjun said । After you blessed ।
I recollected । All memories ।।38।।

No illusion । Does now remain ।
I fully give in । My ‘self’ to you ।।39।।

This extraordinary । Incredible colloquy ।
Stated thoroughly । As took place ।।40।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)

अथाष्टादशोऽध्यायः । मोक्षसंन्यासयोगः

श्रीभगवानुवाच ।

कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ १८-७२॥

अर्जुन उवाच ।

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ १८-७३॥

सञ्जय उवाच ।

इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ १८-७४॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply