रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (९ मे) सलग तिसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही जिल्ह्यासाठी आशादायक बाब आहे. आज नवे ५७६ करोनाबाधित आढळले, तर ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १९५, दापोली २, गुहागर २३, चिपळूण ३१, संगमेश्वर २१, लांजा ३३ आणि राजापूर ४५ (एकूण ३५०), तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ६५, दापोली २५, खेड ३०, गुहागर २६, चिपळूण ३१, संगमेश्वर ३९, लांजा ८ आणि राजापूर २ (एकूण २२६) (दोन्ही मिळून ५७६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २६ हजार ९६१ झाली आहे. आज मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार ३८० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ५५५ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३७ हजार ४६१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ९३३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २० हजार ७७७ झाली आहे. करोनामुक्तांची ही टक्केवारी ७७.०६ टक्के आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे ३ आणि आजचे १० अशा एकूण १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या सर्व १० जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ८०४ झाली असून मृत्युदर २.९८ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २०६, खेड ९१, गुहागर ३३, दापोली ७६, चिपळूण १६४, संगमेश्वर ११७, लांजा ४९, राजापूर ६१, मंडणगड ८. (एकूण ८०४).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
