रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जून) करोनाचे नवे ५८४ रुग्ण आढळले, तर २९३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. नवबाधितांच्या संख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे. आज १८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ४०८, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १७६ (दोन्ही मिळून ५८४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार ९ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.४१ टक्के आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ४९३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार ९८२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार ७३६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज २९३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३७ हजार ९९७ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आज ८६.३३ टक्के झाली आहे.
जिल्ह्यात पूर्वीच्या ९ आणि आजच्या ९ अशा १८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ५१९ झाली आहे. मृत्युदर ३.४५ टक्के झाला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४४४, खेड १४६, गुहागर १३४, दापोली १२३, चिपळूण २९५, संगमेश्वर १७४, लांजा ८२, राजापूर १०९, मंडणगड १२. (एकूण १५१९).
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड