रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९१ च्यावर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ जुलै) एकाच दिवशी एक हजार २६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९१.०७ झाली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २६३, अँटिजेन चाचणी – २०६ (एकूण ४६९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६६ हजार ५१० झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ८.५४ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.४० टक्के आहे.

आज तीन चार हजार ६०९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ४०९ गृह विलगीकरणात, दोन हजार २०० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ४३१ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. आज पाच हजार २१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ३६ हजार ७१४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात १२६८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६० हजार ५७० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९१.०७ टक्के झाली आहे.

जिल्ह्यात यापूर्वीचे ८ आणि आजचे २ अशा १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९०० झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६२४, खेड १७४, गुहागर १४१, दापोली १६७, चिपळूण ३६४, संगमेश्वर १७४, लांजा ९९, राजापूर ११६, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९००).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply