रत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९२ टक्क्यांवर

रत्नागिरी : करोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर आज (१४ जुलै) प्रथमच ९२ टक्क्यांवर गेला आहे. सलग चौथ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

आज ५०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९२.१२ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर १३१, अँटिजेन चाचणी १०० (एकूण २३१). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६७ हजार २४७ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ५.६७ असून एकूण रुग्णवाढीचा दर १३.२४ टक्के आहे.

आज तीन हजार १८० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ३९२ गृह विलगीकरणात, एक हजार ७९४ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी १९० जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.

आज तीन हजार ८४१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ४७ हजार ६०४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात ५०९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६१ हजार ९४८ झाली आहे.

जिल्ह्यात यापूर्वीच्या ३ आणि आजच्या ३ अशा ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९२३ झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६३४, खेड १७४, गुहागर १४४, दापोली १६७, चिपळूण ३७२, संगमेश्वर १७५, लांजा ९९, राजापूर ११६, मंडणगड २८. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९२३).
………….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply