syringe and pills on blue background

रत्नागिरीत आज ९० नवे रुग्ण; ५३ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २२ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ५३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ९० नवे करोनाबाधित आढळले. रत्नागिरी जिल्ह्यात गेले सलग चार दिवस १००पेक्षा जास्त जण करोनामुक्त झाले होते. आज पाचव्या दिवशी मात्र करोनामुक्तांची संख्या १००च्या खाली आली असून, नव्या रुग्णांची संख्या करोनामुक्तांपेक्षा जास्त आहे.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ४१६ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९६.०९ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ९० करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ८३९ पैकी ७९९ अहवाल निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २४९९ नमुन्यांपैकी २४४९ अहवाल निगेटिव्ह, तर ५० पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ४४७ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार १११ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६३० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४१८, तर लक्षणे असलेले २१२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३८३ आहे, तर २४७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आता एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३५, डीसीएचसीमधील ७४, तर डीसीएचमध्ये १३८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७१ जण ऑक्सिजनवर, ३१ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या चार आणि आजच्या एका अशा एकूण पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१० टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१६ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४०१ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३८, दापोली २१५, खेड २२१, गुहागर १६६, चिपळूण ४७१, संगमेश्वर २०८, रत्नागिरी ७९९, लांजा १२४, राजापूर १५९. (एकूण २४०१).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply