hands with latex gloves holding a globe with a face mask

सिंधुदुर्गात सक्रिय करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या खाली

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (६ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ४३ रुग्ण आढळले, तर १०८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सक्रिय करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत चौघांचे मृत्यू नोंदविले गेले.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोघांसह आज नवे ४३ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ३११ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ८, दोडामार्ग ३, कणकवली ७, कुडाळ ९, मालवण १, सावंतवाडी ५, वैभववाडी १, वेंगुर्ले ९, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९४७ झाली असून, सक्रिय रुग्णांपैकी ४४ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९८, दोडामार्ग ३४, कणकवली १५२, कुडाळ २४८, मालवण १४५, सावंतवाडी १३९, वैभववाडी २९, वेंगुर्ले ८९, जिल्ह्याबाहेरील १३.

आज कट्टा (ता. मालवण) येथील प्रत्येकी ७० वर्षांचे दोन पुरुष, मालवणमधील ६८ वर्षांचा पुरुष आणि दाभोळे (देवगड) या गावातील ५५ वर्षांचा पुरुष अशा चार रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. या सर्वांना सहव्याधी होत्या. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४२१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७६, दोडामार्ग – ४१, कणकवली – २९४, कुडाळ – २३७, मालवण – २८२, सावंतवाडी – १९५, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply