रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ६ ऑक्टोबर) जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ७० रुग्ण आढळले, तर १२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार २८५ झाली असून, ७५ हजार २२८ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.१० आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७० करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १४६८ पैकी १४२८ अहवाल निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १३९७ नमुन्यांपैकी १३६७ अहवाल निगेटिव्ह, तर ३० पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ७० हजार १६८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज ६२४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३८६, तर लक्षणे असलेले २३८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३४५ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २७९ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. तसंच ४२ रुग्णांची नावं पोर्टलवर दोन वेळा नोंदवली गेल्यामुळे काढून टाकण्यात आली आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४१, डीसीएचसीमधील १०६, तर डीसीएचमध्ये १३२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५४ जण ऑक्सिजनवर, २८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४३३ एवढीच आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१३, रत्नागिरी ८११, लांजा १२६, राजापूर १६१. (एकूण २४३३).
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड